Pavitra Portal Shikshak Bharti 2026 : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. डाउनलोड डायरेक्ट लिंक या लेखात दिली आहे.
Table of Contents
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
Also Read: पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026: कागदपत्र पडताळणीच्या सविस्तर सूचना आणि वेळापत्रक जाहीर
सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले व त्यातील उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले १,७०,१०८ आहेत.
मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०८/२०२६ या दरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज सायंकाळी ७.०० वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मुलाखतीशिवाय या प्रकारात व्यवस्थापननिहाय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
मुलाखतीशिवाय या प्रकारात व्यवस्थापननिहाय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- जिल्हा परिषद: मुलाखतीशिवाय पदसंख्या १३,२२५ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या ८,४८१ आहे.
- नगर पालिका/परिषदा: मुलाखतीशिवाय पदसंख्या २८० असून, शिफारस होत असलेली पदसंख्या २२६ आहे.
- महानगरपालिका: मुलाखतीशिवाय पदसंख्या १,९५४ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या १,३०६ आहे.
- आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा: मुलाखतीशिवाय पदसंख्या २,४२१ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या १,६०१ आहे.
- शासकीय विद्यानिकेतन: मुलाखतीशिवाय पदसंख्या ५६ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या ५४ आहे.
- खाजगी शैक्षणिक संस्था: मुलाखतीशिवाय पदसंख्या १,८१८ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या १,४५१ आहे.
- एकूण: मुलाखतीशिवाय एकूण पदसंख्या १९,७५४ असून, शिफारस होत असलेली एकूण पदसंख्या १३,११९ आहे.
पदनिहाय रिक्त व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
- इयत्ता १ ली ते ५ वी: मुलाखतीशिवाय पदसंख्या १२,६७१ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या ७,५४१ आहे.
- इयत्ता ६ वी ते ८ वी: मुलाखतीशिवाय पदसंख्या ५,४२१ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या ४,२०७ आहे.
- इयत्ता ९ वी ते १० वी: मुलाखतीशिवाय पदसंख्या १,२९८ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या १,११९ आहे.
- इयत्ता ११ वी ते १२ वी: मुलाखतीशिवाय पदसंख्या ३६४ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या २५२ आहे.
- एकूण: मुलाखतीशिवाय एकूण पदसंख्या १९,७५४ असून, शिफारस होत असलेली एकूण पदसंख्या १३,११९ आहे.
समांतर आरक्षणातील माजी सैनिक (१५%) व अंशकालीन (१०%) याप्रमाणे जाहिरातीत पदे मंजूर आहेत. त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने अनुक्रमे २,७६० पदे व १,७६० पदे रिक्त राहिली आहेत, तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ व पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची १,४०८ पदे रिक्त राहिली आहेत. सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे Converted Round घेऊन भरण्यात येणार आहेत.
Also Read: AI Saathi for Educators Course नोंदणी डायरेक्ट लिंक
पवित्र पोर्टल शिक्षक भरती शिफारस याद्या जाहीर, डाउनलोड डायरेक्ट लिंक
सध्या उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉगीनवर तसेच व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी होम पेजवर Download या मेनूमध्ये देण्यात आली आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
- Merit List_Phase 1_Without Interview_ Regular Round_Muncipal Corporation
- Merit List_Phase 1_Without Interview_ Regular Round_Nagar ParishadPalika
- Merit List_Phase 1_Without Interview_ Regular Round_Private Management
- Merit List_Phase 1_Without Interview_ Regular Round_Shaskiy Vidyaniketan
- Merit List_Phase 1_Without Interview_ Regular Round_Zilla Parishad
- Merit List_Phase 1_Without Interview_ Regular Round_Tribal Department
- Zilla Parishad Without Interview
- Muncipal Corporation Without Interview
- Nagar Parishad Nagar Palika Without Interview
- Shaskiy Vidyaniketan Without Interview
- Tribal Department Without Interview
- Private Management Without Interview
- Private Management With Interview
मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत उमेदवारांना SMS द्वारेदेखील कळविण्यात येत आहे. उमेदवारांना https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पाहता येणार आहे.
पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत आपले म्हणणे किंवा मागणी इत्यादी बाबींसाठी राज्यस्तरावर “तक्रार निवारण व दुरुस्ती समिती” स्थापन करण्यात आली आहे. आपल्या तक्रारी edupavitra2025grcc@gmail.com या ईमेलवर दिनांक ०६/०९/२०२६ अखेरपर्यंत पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.
निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती आवश्यक कागदपत्रांची यादी व वेळापत्रक येथे पहा
पवित्र पोर्टल शिक्षक भरती शासन निर्णय
- पवित्र पोर्टल शिक्षक भरती दि 24 जुलै 2026 रोजीचे शुद्धीपत्रक
- पवित्र पोर्टल शिक्षक भरती दि 20 जानेवारी 2026 रोजीचा शासन निर्णय
- दि 20 जानेवारी 2026 रोजीचा दूसरा शासन निर्णय